White Board virtual classroom
जि.प.प्रशाला उमरगा ही एक Semi-English माध्यमाची प्रशाला आहे. प्रशालेतील विध्यार्थ्यांना Mathematics व Science हे विषय इंग्रजीतून शिकवले जातात. प्रशालेतील
तज्ञ शिक्षक उपलब्ध शैक्षणिक साहित्य , तसेच Audio – Video च्या सहाय्याने या विषयाचे
अध्यापन करतात.
याशिवाय आपल्या जिल्याच्या जिल्हाधिकारी
दिपा मुधोळ मुंडे मॅडम यांच्या पुढाकारतून इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना
Science हा विषय इंग्रजी माध्यमातून White Board virtual classroom द्वारे जिल्हयातील 20 शाळांच्या विद्यार्थांना
शिकविले जातात. जिल्ह्यातील या 20 शाळामध्ये आमच्या Z.P.Highschool Omerga चा समावेश
आहे.
White Board virtual classroom या उपक्रमांतर्गत D.I.E.T Osmanabad तर्फे जिल्ह्यातून
एका तज्ञ विज्ञान शिक्षकाची प्रत्येक आठवडयातून एक दिवस निवड केली जाते. तो शिक्षक
D.I.E.T Osmanabad येथून White Board virtual classroom द्वारे
जिल्यातील 20 शाळेतील विद्यार्थांना Science lesson चे Online अध्यापन करतात. याद्वारे
विद्यार्थांना इतर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकाशीही संवाद साधता येतो.
No comments:
Post a Comment
Please , do not enter any spam link in the comment box.