जि.प.हायस्कूल उमरगा येथे मियावाकी जंगल लागवड
जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर मियावाकी पद्धतीच्या वृक्षाची लागवड उमरगा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले व उमरगा तालुक्याचे तहसीलदार श्री संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकमतचे पत्रकार श्री गुणवंत जाधवर जिल्हा परिषद हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री पद्माकर मोरे नायब तहसीलदार श्री काळे साहेब व वनाधिकारी श्री माकणीकर साहेब व प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते .यावेळी वेगवेगळ्या 20 प्रकारची रोपे मियावाकी जंगल तयार करण्यासाठी एक मीटर बाय एक मीटर अंतरावर साडेतीन हजार रोपांची लागवड करण्यात आली .अशा प्रकारची लागवड करण्यात आलेली उमरगा शहरातील एकमेव शाळा आहे. 3500 वृक्ष लागवड केल्याने मियावकी जंगल ही संकल्पना उमरगा तील सर्व जनतेला पाहावयास मिळणार आहे
.
No comments:
Post a Comment
Please , do not enter any spam link in the comment box.