प्रजासत्ताक दिन सोहळा
आमच्या प्रशालेतील प्रजासत्ताक
दिन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच . एक आठवडा आधीपासूनच याची तयारी चालू होते.
विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन होते. या कालावधीत विद्यार्थांचा उत्साह अगदी ओसंडून
वाहतो. विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेउन हुतात्म्याचं स्मरण करतात व त्यांचा
कार्याचा महती व्यक्त करतात.
प्रजासत्ताक
दिनी सकाळी नियोजित वेळेला मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहन होते. स्काउटच्या विद्यार्थीनीकडून
परेडचे संचलन होते. हे परेड संचलन आमच्या प्रशालेचे बलस्थानच म्हणावे लागेल.वाद्यांच्या
सुरेख तालावर अगदी नेत्रदीपक परेड संचलन होते. त्यांनंतर विद्यार्थांची कवायत होते.विद्यार्थांचे
विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होतात. याच वेळेस उपविभागीय कार्यालय उमरगा येथे ध्वाजारोहनासाठी
स्काउटच्या विद्यार्थीनी रवाना होतात. शेवटी विद्यार्थांना खाउ वाटप होउन कार्यक्रमाची
सांगता होते.
No comments:
Post a Comment
Please , do not enter any spam link in the comment box.