शालेय परिपाठ

जिल्हा परिषद प्रशाला उमरगा ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने ‍हार्दिक स्वागत.

क्षेत्रभेट – पोलिस स्टेशन उमरगा

क्षेत्रभेट – पोलिस स्टेशन उमरगा

       


          क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत आमच्या प्रशालेच्या इयत्ता 6 वी ते 8 वी च्या  विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशन उमरगा येथे नेण्यात आले. पोलिस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांना पोलिस प्रशासन विभाग, तुरूंग विभाग, CCTV नियंत्रण कक्ष , शस्त्रागार विभाग अशा विविध विभांगाची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. पोलिस प्रशासनाशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. त्यांना विविध प्रश्न विचारले. पोलिस हे समाजाचे मित्र आहेत व पोलिस प्रशासन समाज संरक्षणासाठी कशा पद्धतीने कार्यरत असते याची माहिती विद्यार्थ्याना देण्यात आली. विद्यार्थ्याना विविध शस्त्र हाताळण्याची संधी दिली. शेवटी विद्यार्थ्याना खाउ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.



No comments:

Post a Comment

Please , do not enter any spam link in the comment box.