SSC 1992 Batch चा स्नेहमेळावा
दिनांक 22/12/2018 वार शनिवार रोजी तब्बल 26 वर्षानंतर आमच्या प्रशालेतील 1992 SSC बॅच चा स्नेहमेळावा घेण्यात आला. या निमित्ताने गुरू शिष्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी एकमेकांशी संवाद साधला. Whatsapp Group च्या माध्यमातून एकत्र आलेल्या या बालमित्रानी आपलया वेळेच्या सर्व गुरूजनांना आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार केला व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या शाळेप्रती असलेली ममत्वाची भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून व विचारातून दिसून येत होती. याच भावनेतून विद्यमान विद्यार्थ्यासाच्या अध्ययन – अध्यापनासाठी उपयुक्त अशी 49 इंची LED दुरचित्रवाणी संच त्यांनी शाळेला भेट दिली.
आपल्या बालमित्रांप्रती असलेली आपुलकी त्यांनी
केवळ शब्दांनीच नाही तर आपल्या कृतीद्वारे व्यक्त केली. आपला बालपणीचा मित्र आजारावर
उपचार घेत असल्याची माहिती मिळताच त्यांनी क्षणातच त्याला 50000 रूपयांची आर्थिक मदत
करून आपुलकीची व मित्रत्वाची जाण आजही कायम ठेवली.
No comments:
Post a Comment
Please , do not enter any spam link in the comment box.