Sunday, 11 July 2021
Friday, 17 July 2020
मियावाकी जंगल लागवड
जि.प.हायस्कूल उमरगा येथे मियावाकी जंगल लागवड
जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर मियावाकी पद्धतीच्या वृक्षाची लागवड उमरगा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले व उमरगा तालुक्याचे तहसीलदार श्री संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकमतचे पत्रकार श्री गुणवंत जाधवर जिल्हा परिषद हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री पद्माकर मोरे नायब तहसीलदार श्री काळे साहेब व वनाधिकारी श्री माकणीकर साहेब व प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते .यावेळी वेगवेगळ्या 20 प्रकारची रोपे मियावाकी जंगल तयार करण्यासाठी एक मीटर बाय एक मीटर अंतरावर साडेतीन हजार रोपांची लागवड करण्यात आली .अशा प्रकारची लागवड करण्यात आलेली उमरगा शहरातील एकमेव शाळा आहे. 3500 वृक्ष लागवड केल्याने मियावकी जंगल ही संकल्पना उमरगा तील सर्व जनतेला पाहावयास मिळणार आहे
.
Thursday, 16 July 2020
PREMATRIC SCHOLARSHIP
PREMATRIC SCHOLARSHIP 2020-2021
जिल्हा परिषद प्रशाला उमरगा च्या अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती मंजूर झालेली यादी देण्यात आली आहे. सदर यादीमध्ये शाळेतील शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे. या शैक्षणिक वर्षात एकुण ६० अल्पसंख्यांक समाजाच्या विध्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे .
Subscribe to:
Posts (Atom)